Monday, 16 January 2017

आंनद वृत्तीत असावा लागतो

आंनद वृत्तीत असावा लागतो 
 कशातही मानण्यासाठी 

 तो मिळतो महालात ,
  बंगल्यात,चाळीत  
 अगदी रस्त्याकडेच्या 
 खोपटात सुद्धा 

  आंनद वृत्तीत असावा ........

 तो मिळतो करोडोत 
 लाखात ,हजारात 
 अगदी आज्जीने दिलेल्या 
 नया पैश्यात सुद्धा 

 आंनद वृत्तीत असावा ..........

 तो मिळतो फाईव्ह स्टार मध्ये 
 इराण्या कडे ,खानावळीत 
 भूकलागल्यावर  मिळणाऱ्या 
 कोरभर शिळ्या भाकरीत सुद्धा 

 आंनद वृत्तीत असावा ............

 तो मिळतो आकाशात 
 दारात ,घरात  कुठेही 
  कधी तर   मस्त मातीत  
 लोळून सुद्धा 

 आंनद वृत्तीत असावा .........

 त्याला नसते वेळ काळ स्थळ 
 हवी असते फक्त वृत्ती 
 ती असली कि मिळतो 
 आंनद आंनद आणि आंनद  


 सुनील १६/१/ १७

Saturday, 14 January 2017

उगाच मिरवताय टेंभा

उगाच मिरवताय टेंभा 
 पुण्यात पुणेकर आहे तरी कुठे 
  सोलापूरकर ,लातूरकर नांदेडकर 
 मद्रासकर ,कोचिनकर अगदी पटना 
 बिहारकर नेपाळकर सुद्धा
  यांनीच भरलंय पुणे 
  उगाच मिरवताय टेंभा .........
  सदाशिव पेठेत असतील दोनचार घरे 
 तेथेही असतील म्हतारे कोतारे 
 बाकीच्यांनी केव्हाच ठोठवलीयत 
 अमेरिकेची दारे 
  उगाच मिरवताय टेंभा ..........

 बदलीय सारी संस्कृतीचं पुण्याची 
 तुळशी बगे पेशा कॅम्पा तली  गर्दी मोलाची
 बालगन्धर्व  पेक्षा आयनॉक्स चीच 
 चर्चा ज्याची त्याची
  उगाच मिरवताय टेंभा ............
 शांत स्वच्छ सुंदर पुणे 
 केव्हाच हरवलंय ट्रॅफिकच्या गदारोळात 
 ओव्हरब्रीजच्या जनजाळात ,
 आता इथे मराठमोळा बाज दिसतो कवचितच 
 दिसतो मात्र आंग्लाळलेला गदारोळ खचितच 
  उगाच मिरवताय टेंभा.................
  हल्ली इथे पैठणीचे दुकानदार कमी 
 पटलुणीचे दुकानदार भेटतात बक्कळ 
 खणाचे कापड हुडकावे लागेल 
 टॉप मात्र दिसतील लटकवलेले दुकानभर 
 उगाच मिरवताय टेंभा ...............
  मराठी सणाच विचारलं तर ते 
 दिसतात फ्लेक्सवर 
 बाकी हट्ट पूजे पासून दुर्गा पूजे पर्यंत 
 फ्रेंडशिप डे पासून ख्रिसमस पर्यंत 
 गाजतात पुणे भर 
 उगाच मिरवताय टेंभा ............
Sunil

Sunday, 8 January 2017

त्या पाठीतल्या धपाट्याची चव सय
आजच्या गुडमॅारनींग मध्ये नाही
म्हनूनच आज लवकर कुणी उठत नाही

त्या शिवलेल्या गोधडी ची सय उब
आजच्या ब्लॅंकेट वा रग मध्ये नाही
म्हणूनच हल्ली झोप काही सरत नाही 

त्या घंगाळातल्या उन पाण्या ची सय गारवा
आजच्या टबबाथ वा शॅावरला मध्ये नाही
म्हणूनच हल्ली प्रसन असे वाटत नाही

सुनील ८/१/१७

Wednesday, 28 December 2016

देवा असा का वागतोस 
 चांगल्याला चागलं वाईटाला वाईट 
 असं का नाही वाटत ?

 जगाला हसवतो तो आतल्या आत रडतो 
 अन जो जगाला रडवतो 
 तो  जाहीर खदा खदा हसतो

 देवा असा का वागतोस ............

 वाईटाचा घरी पाणी भरते लक्ष्मी 
 चांगल्याची सरस्वती मात्र 
 भांडे घासते घरोघरी 

 देवा असा का वागतोस ...............

 तू म्हणे न्याय देतोच शेवटी 
 पण काय उपयोग रे त्याचा 
 तो पर्यंत पाणी सार सागरा पर्यंत पोहचत 

 देवा असा का वागतोस .............

 लोक म्हणतात कलियुग का काय आहे ते 
 आता म्हणे असच व्ह्यच 
 अरे पण सत्ययुगा पासून तो  तूच आहेस 
 मग तुझा न्यायाचा काटा भंगला  कि गंजला
 युगान युगे जाता जाता

 सुनील २८/१२/१६

Sunday, 25 December 2016

नका बसवू रे आम्हा 
 स्मारक पुतळ्यात 
 तिथे फक्त चिमणी कावळे विष्ठतात

 नाही जगलो या साठी 
 तुडविली राष्ट्रे उडविली मुंडके गनिमांची
 खपविला देह राष्ट्र कार्यात 

 नका बसवू रे आम्हा ................

 त्या तिथीला उठवा आमुच्यातले विचार 
 जगवा राष्ट्राचा जागर 
 पेटवा स्फुलिंगे समरावर लढण्यास  
 तोच होईल अमुचा उचित आदर 

 नका बसवू रे आम्हा .............

 नका मिरवू आम्हा मूर्त्यांना 
 घालुनी शब्द वाद्यांचा गोंधळ विकट
 दुखी करीता तुम्हीं आम्हास 
 होतो अमुचा जळफळाट 

 नका बसवू रे आम्हा .....................

 असेच कराल बुडवून टाकाल
 जे दिधले विचार ठेवुनी  उघडे डोळे  
 राहील पुढचच्या  हाती 
  नुसतेच आमुचे  मातीचेच  गोळे 

 नका बसवू रे आम्हा................... 

 . 
 सुनील २५/१२/१६

Saturday, 24 December 2016

जन का नेता है फिर भी  श्रधेय है वो
 जीवन का पथदर्शी जनमन का नेता है वो

 अटल है अपने विश्वास ,कर्म अपने सघटन पर
 फिर भी सबके विश्वास का धनी है वो

 राजनीती में स्रह्दय ,कवि ह्रदय का है वो
 घृणा के राजनीती का अजोड़ हत्यारा वो

 नही भूल सकते उसका राष्ट्र के प्रति आवेश
 न भूलो उसको राजधर्म  का उपदेश
 एकांत मैं है  फिर भी  गूंजता उसका सन्देश                                            जन का नेता है फिर भी  श्रधेय है वो
 जीवन का पथदर्शी जनमन का नेता है वो

 अटल है अपने विश्वास ,कर्म अपने सघटन पर
 फिर भी सबके विश्वास का धनी है वो

 राजनीती में स्रह्दय ,कवि ह्रदय का है वो
 घृणा के राजनीती का अजोड़ हत्यारा वो

 नही भूल सकते उसका राष्ट्र के प्रति आवेश
 न भूलो उसको राजधर्म  का उपदेश
 एकांत मैं है  फिर भी  गूंजता उसका सन्देश                                            

Sunday, 11 December 2016

बँक वालो ये क्या करदिया 
मोदी के मेहनत को राष्ट्र के उन्नती को 
क्यू लाल  पर्चम दिखा दिया

नाही सभी लेकिन आप में हि है कूछ गद्दार 
जिन्होने काले वालो से मिलकर
कर दिया नोटो का कारोबार

बँक वालो ये क्या करदिया ............. 

आप न करते तो कैसे आता 
बिचोलियो ,काले धनवालो के पास
नये नोटो का भं डा र 

बँक वालो ये क्या करदिया .............. 

गरीब बिचारे सामान्य जन
कतारो में करते रहे इंतजार 
अपने तो उनके घर लगाय नोटोका अंबर

देश में एक नयी पहल जगी थी
आप में से हि किईयोंकी  मेहनत 
इस राष्ट्रकार्य में रंग ला रही थी 
क्यू कुचला इसको बारंबार

बँक वालो ये क्या करदिया ..........

जब कभी इतिहास लिखेगा 
न लिखी जायेगी आपकी मेहनत 
इन गद्दारो कि वजह से 
बदनाम होगी तुम्हारी धरोहर 

बँक वालो ये क्या करदिया ..............

अभी वक्त पर नाही संभलतें
इन गद्दारो को बे नकाब न करते 
जनता आपको सबक सिखयेगी 
तब ना करना अपने कष्टोका इजहार 

बँक वालो ये क्या करदिया .............. 

सुनील १२/१२/16

Friday, 9 December 2016

कृष्णा ने दिधले अर्जुना गीते चे ज्ञान 
त्यात भरला अर्थ कर्म मोक्षाचा 
सार्थ अभिमान

विद्या दान दिधले त्यात 
अक्षय,साम्य ,ईशवर ,ब्रम्ह विद्येचे ज्ञान 
दिग्मूढ जनास दाखविला 
जगण्याचा सन्मान  

ते ज्ञान आहे शाशवत 
अवीट ,अमिSत,अगणित 
त्याने दिधले मनुष्यास 
मोक्षाचे प्रशस्त मार्गक्रम

गीता मस्तकी धारण करारे 
तिला तुमच्यात जागृत करारे 
तरच सार्थक  होईल
 कृष्णा चे  कृष्णार्पण 
sunil 10/12/16
गिता जयंती 

Thursday, 1 December 2016

एक प्रयत्न गझल सारखे काही

एक प्रयत्न गझल सारखे काही करण्याचा 
जमतेय का नक्की सांगा नियतीचा फेरा येतो जेव्हा 
सारेच पालटुनी जातो 

मी कैफात जगत होतो 
मंद्र तार सप्तकात बेफाम 
स्वर बरसत होतो 

नियतीचा एक पलटा
ऐसाच मजवरी आला 
साऱ्याच सूर सप्तकांना खर्जात घेऊनि गेला 

नियतीचा फेरा येतो जेव्हा 
सारेच पालटुनी जातो

लावताच तारा वाटले 
सुंदर जुळल्या आता 
साऱ्याच सुरांना धरुनी झंकारत होत्या 

नियतीने फिरविता कळ 
साऱ्याच बेसुऱ्या जहाल्या

नियतीचा फेरा येतो जेव्हा
सारेच पालटुनी जातो 

मल्हार लागला  होता 
सुंदर फेर धरुनी 
घन घन बरसत होता 

मध्येच नियतीच्या सूर पलट्याने 
भैरवी भरून गेला 

सुनील २/१२/१६

तो आणि त्याचे गणित

तो आणि त्याचे गणित

विश्वाचे गाडे चालवताना 
त्याला हि पाप पुण्य  चांगले वाईट 
अशी बरीच त्रैराशिके सोडवावीच लागतात 
बाकी शून्य करण्या साठी  
भूकंप ,पूर ,सुनामी असले हाच्चे घायवेचं लागतात 

तोही दमतो थकतो 
गणितात चुका करतो 
कधी तरी चुकून डोळा सुद्धा लागत असेल 
म्हणूनच तर कधी कधी चांगल्याला दुःखाचे भोग 
आणि वाईटाला सुखाचे भोग पदरी पडतात 

त्यालाही हल्ली गरगरायला लागत
आकड्यांच्या हालचाली बघून 
चांगल्याचे वाईटात व वाईटचे चंगल्यात 
रूपांतरा ची गती पाहून 
तो तरी काय करणार तोही वाढवतो   हाच्याचे 
प्रकार त्रीव्रता  सुद्धा 

नाही सुधारली कृती आपली माणसाने 
वारंवार त्याच्या गणिताची फजिती करून 
घेईल तो एक एक मोठा हचा प्रलय नावाचा 
सारेच गणित करून शून्य 
जाईल क्षीरसागरात अराम करायला 

सुनील ३०/११/16

Saturday, 26 November 2016

बंद करदो इन बंद वलोको

बंद करदो इन बंद वलोको 
राजनीती के गलियारोंसे 

अपने स्वार्थ के लिए 
ये जनता को उकसायेंगे 
तपे आंच पर अपनी रोटी सकेंगे 

बंद करदो इन बंद वलोको 
राजनीती के गलियारोंसे 

देश हित में जो भी होगा 
अब सो सो चलेगा 
चाहे मोदी हो या और कोई 

बंद करदो इन बंद वलोको 
राजनीती के गलियारोंसे 

बहुत सहा है राजनीती का गन्दा बोझ 
अब न चलेगा इनका मंज़हर

बंद करदो  इन बंद वलोको 
राजनीती के गलियारोंसे 

मिडिया वालो शर्म करो 
आप किसी को  ना  गिरा सकते 
ना किसी को उठा सकते 
देश हित के आड़ आओगे 
आप ही हमारे मन से गिर जाओगे 

बंद करेंगे  इन बंद वलोको 
राजनीती के गलियारोंसे 

सुनील २६/११/16

Thursday, 17 November 2016

लक्ख समाज मनाचा तो आरसा होता

https://www.google.co.in/imgres?imgurl=http%3A%2F%2Fwww.wallpapersxl.com%2Fwallpapers%2F1000x747%2Fbal-thackeray%2F535635%2Fbal-thackeray-undated-file-photo-of-in-mumbai-chief-535635.jpg&imgrefurl=http%3A%2F%2Fwww.wallpapersxl.com%2Fwallpaper%2F2048x1152%2Fbal-thackeray-x-hd-images-photos-349338.html&docid=8wjohw_II_w2uM&tbnid=PKrBRI8DFNxnMM%3A&vet=1&w=1000&h=747&hl=en-GB&safe=active&bih=492&biw=320&ved=0ahUKEwiM_PWS_K_QAhVLrI8KHfsLC28QMwgjKAEwAQ&iact=mrc&uact=8

माननीय बाळासाहेबांना आदरांजली


लक्ख समाज मनाचा तो आरसा होता

भय वाटते आम्हा सामान्यास सांगण्यास
तो ते जगास ठासून सांगत होता

लक्ख समाज मनाचा तो आरसा होता.

चैतन्यदायी ओघवती तरी  स्पष्ट रांगडा
असा भाषा प्रभू होता.

लक्ख समाज मनाचा तो आरसा होता

केले त्याचे न दुःख पेटविल्या ज्योतीचे  दायित्व
तितकेच त्यावरी ममत्व ऐसा  पितृत्वाचा हात होता

लक्ख समाज मनाचा तो आरसा होता

हिंदुत्वाचा जाज्वल्य अभिमान तरीही जपला मराठीचा  बाणा
लोकांसाठी संप्पन हृदयसम्राट होता

लक्ख समाज मनाचा तो आरसा होता

नसतील ते आता जरी तरी सावली न सुटली

नसतील ते आता जरी तरी सावली न सुटली
सरणा वरची आग अजून कुठे विझली
सामर्थ्य देत राहील  सतत
ऐसा तो  तेज दीप आहे

sunil 17/11/16