तू नाहीस म्हणुनी
हरविल्या अमुच्या साऱ्याच वाटा
उंच एवढी होतीस तू
त्या सावलीत आम्ही शोधयचो
अमुच्या वाटा
तू नाहीस म्हणुनी ,,,,,,,,,,,,,,,,,,
तू उराशी घेउनी पांघरली मायेची सावली
त्या सावलीत आम्हा लख्ख दिसती
अमुच्या वाटा
तू नाहीस म्हणुनी,,,,,,,,,,,,,,,,,,
उन पावसाची ना बाळगली तू तमा
गडद सावली चा न आम्हा कधी तोटा
त्याच कारणे आम्ही धुडाळू शकलो
अमुच्या वाटा
तू नाहीस म्हणुनी ,,,,,,,,,,,,,,,,,,
तू नाहीस म्हणुनी आता हरवली ती सावली
आता या तप्त जगात शोधयाच्या कश्या
आम्ही अमुच्या वाटा
सुनील १७/४/१६
No comments:
Post a Comment