निशब्द आसमंत सारा
निशब्द दिशाही साऱ्या
मी करू पहातो शब्दबद्ध
हि निशब्दता
वेगाने वाहतो वारा
वेगात वाहतो झरा
मी पकडू पाहतो वेगातील
हि स्थिरता
दगडाची अचल स्थिरता
तपस्वी साधूंची ध्यानातील स्थिरता
मी जाणवू पहातो स्थिरतेतील
हि आवेगता
वेड्यातील वेडेपण
ध्येय वेड्यातील वेडेपण
मी पाकडू पाहतो वेडेपणातील
हि शहाणपण
सुनील १२/५/१६
No comments:
Post a Comment