पेटला वॆशखचा वणवा
तप्त झाला आसमंत सारा
चहू कडे पाण्याची वानवा
वाचवा हो वाचवा पाणीच वाचवा
नद्या नाले केले आम्ही फस्त
वाहत्या पाण्याला केले आम्ही व्यस्त
त्यचा फुटला बंध आता ते करील
आम्ह्लाच परास्त
वाचवा हो वाचवा पाणीच वाचवा
पाणी नाही विहिरी त तलावात
थोडेसेच जलाशयात
हा थोडाच साठा पुरणार कोणाला कुठून
सारे वितरणच उध्वस्त
वाचवा हो वाचवा पाणीच वाचवा
न ठेवलं स्वयम शिस्त
ठेवुनी कोणावरी भिस्त
पाण्याविना राहाल का स्वस्थ
मुकाल जिवाशी हाल हाल
होतील निश्चीत
वाचवा हो वाचवा पाणीच वाचवा
तुमच्या अनीर्बंध वागण्याच
त्रास तुम्हाला होईल निश्चीत
त्याही परास पुढच्या पिढीला
काय ठेवाल संचीत
वाचवा हो वाचवा पाणीच वाचवा
सुनीळ ४/०५/१६
No comments:
Post a Comment