सहज सुख हवे
हेच दु:ख आज चहूकडे
जो तो धावतो सहज सुखाला
ज्याचा त्याचा तोच उद्देश
करती त्या साठी काहीही
सहज सुखाचे ध्यासवेडे
सहज,,,,,,,,,,,
सुख हेची मृगजळ
हे न जाणती हे जन
सुखाच्या लालसेने
दु:खास निमत्रण देती
हे बावडे
सहज,,,,,,,,,,,,,,,,,,,
सुखा मागे दुख धावते
जैसे दिवसा मागे रात्र
सुख क्षनभंगुर दुख शाश्वत
हेच यांसी न उपडे
सहज,,,,,,,,,,,,
सुख नव्हे शांती हवी
हाच खरा तर शोध व्हवा
दुखला शांती चे वावडे
सहज,,,,,,,,,,,,,,,
सुख दु:खा च्या पलीकडे
वसती शांती तीच शाश्वत
ती गवसता जीवन होईल निर्मल
हयाचे ज्ञान यांना कोण
देणार रोकडे
सुनील १९/५/१६
No comments:
Post a Comment