२१ में १९९१
पंचेवीस वर्षे झाली हो अमुच्या लग्नाला
डोळ्याच्या इशाऱ्यावर
चलतो हल्ली अमुचा संसार
न बोलताच प्रकट होतो अमुचा उद्गार
पंचेवीस वर्षे,,,,,,,,,,,,,,,,,,
तिचा राग तिची धुसफूस
माझा त्रागा आणी माझी खुस फूस
न बोलताच कळतो आम्हाला
अमुचा विचार
पंचेवीस वर्षे,,,,,,,,,,,,,,,,,,
तिने वटारताच डोळे
जाणवते शब्दाची चनचन
चढता आवाज माझा
डोळ्यातील आसवाची रिमझीम
पंचेवीस वर्षे,,,,,,,,,,,,,,,,,
लग्ना नंतर ती अबोल
माझी बडबड फार
सरता २५ वर्षे
उलटे पडले फासे पार
पंचेवीस वर्षे,,,,,,,,,,,,,,,,
वाटते हल्ली आम्हाला
राहिला नाही प्रेमाचा संवाद
गैर समज आहे अमुचा
मुरलेल्या लोणच्याचा
लागतोचना उचलून खार
सुनील २१/५/१६
No comments:
Post a Comment