ओघळून जाईल जेथे मी पणाची मुजोरी
उभे करिन तेथे देऊळ
देव समोर घेवूनी
अंतरीचा नाद जेथे लागलासे दिसू
उभे ठाकला तेथेच विठ्ठल
ऎसे मज लागले भासू
ध्यानस लाभलो जेथे
रमलो तिथे मी
ते राऊळ देवाचे लागले से दिसू
सरले च सारे काही
न भासे उणे दुने काही नाही
सारेच निर्मल शांत
वैकुंठा च्या मार्गाने चालले
माझे राउळ भेटीला
सुनील १५/५/१६
No comments:
Post a Comment