Monday, 13 June 2016

तुझ्या बोलण्यातला गंध

angry indian wife cartoon के लिए चित्र परिणाम


तुझ्या बोलण्यातला गंध
आता मला कळू लागला

तुझ्या अहो तली स्वरावली
अताच उमजू लागली
त्यातले आरोह अवरोह
मला जाणवूच  लागले

तुझ्या डोळ्यातल्या दृश्याचा
आवाका मला कळू लागला
त्यातील भाव भावनां चा
उद्वेग मला भासू लागला

तू शीत म्हणता
भाताची चव मला कळू लागली

नाही कळले इतकेच
रंग किती त्या छटा चे
बदलतात केंव्हा कसे ते विषयानरूप
 त्यंना कोणत्या छटा कधी ते

सुनील १३/६/१६ 

No comments:

Post a Comment