Monday, 27 June 2016

वारी चीही गंम्मत न्यारी




वारी चीही गंम्मत न्यारी
संत भेटी दारो दारी ।

वारी जागविते संत अंतरी
चालविते पंढरी च्या दारी ।

वारी जाळिते मळभ अंतरी
शीतलता चंद्रभागा तीरी |

वारी जागविते भाव अंतरी
ओढ लागते सावळ्या उरी|

वारी पुर्ण  होते अंतरी
जेंव्हा भेटे पांडूरंग उराउरी ।

सुनील 

No comments:

Post a Comment