आलास बाबा ये
तुझ्याच साठी थांबवल होत
तेराव धन्याच
तुझ्याविना बोडकी झलेली
जमीन एक टक बघयचा
स्वताशीच कायबाय बडबडयाचा
लेकराच्या पोटासाठी साठी रातभर झुरायचा
सहन झाला नाही सल त्याला
तुझ्या विन संसाराचा गाडा
कसा काय वडायचा
निर्णय केला असेल त्याने
सर्वांशी लढ्याचा
अंदाज घेतला असेल तुझ्या ताकदीचा
ठरल असल शेवटी त्याच मलाच बोडकी
करायचा
हिरव्यागार शेताकड
बघितल्या शिवाय त्येच्या पिंडाला
कावळा नाही शिवायचा
ये बाबा ये
लई कपाळ पुसली आता
कोणी तरी आमच्यातली
सवाशीण राहू दे
सुनील १४/६/१६
No comments:
Post a Comment