Wednesday, 20 April 2016

हे सारे स्वप्नातच मी का पाहतो ?




हे  सारे  स्वप्नातच मी  का पाहतो ?

विचारला जिथे प्रतिष्ठा
विकृत विचारांची होते चेष्टा
राष्ट्राला होती प्रतीमा सुंदर
जिथे राष्ट्र प्रेमाचा आदर

हे  सारे  स्वप्नातच मी  का पाहतो ?

गरीबीचा नसे लवलेश
श्रीमंत ही  नसे अभीनवेश
चालणाऱ्यांचा असतो आदर
गाडीवाल्यांचा हि नसतो अनादर

हे  सारे  स्वप्नातच मी  का पाहतो ?

कष्टाच्या कामाला आहे प्रतीष्ठां
बुद्धीवर हि तेवढीच निष्ठा
माणसातल्या माणूसकीचा होतो आदर
माणसातल्या विकृती इथे ना पसरती चादर

हे  सारे  स्वप्नातच मी का  पाहतो ?

उद्योगातील उद्यमीना आहे इथे मान्यता
निरुद्योगी ला इथे न स्वस्थता
प्रामाणिकता इथे जिंकते
अप्रमनिका चे भांडे उलटे

 हे  सारे  स्वप्नातच मी का  पाहतो ?

सत्यात उतरावे हे  सारे
असे मनी बांधतो भारे
पुन्हा जीवनाचे चक्र चालू
आहे तशाच जगात लागतो मी चालू

सुनिल    २०/०४/१६




No comments:

Post a Comment