Wednesday, 3 August 2016

हीच नांदी श्रावण आपुल्या दारी















फेसाळता चहा 
कुंद पावसाळी हवा 
अचानक पावसाच्या सरी 
हीच नांदी श्रावण आपुल्या दारी ।।

सणांची रेलचेल 
प्रसंन्न मांगल्याची चाहूल 
नवलाईच सारी 
हीच नांदी श्रावण आपुल्या दारी ।।

झाडांना पालवी 
हिरवीगार निसर्गाची रजई च  सारी 
निसर्गाची हि किमया न्यारी 
हीच नांदी श्रावण आपुल्या दारी ।।

उठा आता सोडा तो पेपर 
लागा सणांच्या तयारीला 
आली  आतून खर्जातून ललकारी 
हीच नांदी श्रावण आपुल्या दारी ।।



http://trgln.com/offer.php?oid=7286220469e648747b2f43f43408c80e&uid=ca55a1060fa3d35c91d600f34293da60

Battery saver http://trgln.com/offer.php?oid=046f92ce10d225d67fddce573fc8d0eb&uid=ca55a1060fa3d35c91d600f34293da60

No comments:

Post a Comment