Sunday, 7 August 2016

कशी ओवाळू आरती








कशी ओवाळू आरती 
तो तरी अंतरी बैसला 

ध्यानी मनी अधरी उदरी 
ठायी ठायी त्याचाच श्वास 
सारे त्याच्यातच समवतात 

कशी ओवाळू आरती,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

आरतीचे ताट त्याच्याच हातात 
निरंजन वाती त्याचीच निर्मिती 
सारे त्याचेच कोण करतो कोणाची आरती 

कशी ओवाळू आरती,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

त्याचीच निसर्ग निर्मिती 
भरून तो वातावरणात 
अंतरी बाह्य त्याचेच स्वागत 
ऐसे असता करू कोणाची आरती 



No comments:

Post a Comment