देव म्हणतो जरी असतो मी मुका
तरी नाही देत कुणाला सहजा सहजी अध्यात्माच्या सुखा
गोऱ्ह्याने तुडवले स्वाताच्याच बालका
तेंव्हाच त्याला दिली विठ्ठल भक्तीची पताका
तुकाला ही नाही दिली घर जाळ्या बिगर
गंगेतून कोरडी गाथाची पुस्तिका
ज्ञानला ही फिरविले हाती घेऊन भिक्षा पात्र जणू भिक्षुका
तेंव्हाच वादविले त्याच्या करवी रेड्याच्या मुखातून वेदाची रुचिका
त्याला नको असते तुमचे वैभव नको असतो पैसा अडका
त्याला हवा असतो भक्ती आणी समर्पणाचा टाका
No comments:
Post a Comment