Friday, 11 November 2016

सुख दुःखा च्या पलीकडे






सुख दुःखा च्या पलीकडे अशी एक जागा
 तिथूनच जग दिसे आस्चर्यची पागा

 सारेच धावती मागती जयाचे अस्तित्वच  नाहीं
 शाशवताला तिथे कोणी विचारतच नाही  

 पक्षी उंच आकाशात उडत सारे कसे त्यासी दिसे
 तसे त्या जागे वरून पाहता मानवाशी  भासे

 तिथे पोहचताच राग लोभ विरघळून जाई
 मोहमयी दुनियेची सारी रयाच उडून जाई

 पोहचताच तुम्ही तिथे तुमचेच ना उरता
 करुणेच्या सागरा मध्ये यथेच डुंबता

 सुनील १२/११/16  

No comments:

Post a Comment