Wednesday 9 November 2016

व्यपाऱ्याची वेदना

व्यपाऱ्याची वेदना


तुम्हला  काय हो मोदी
तुम्ही झालात मोकळे एक फतवा काढून
रात्रंदिवसाची  आमची मेहनत माती मोल करून

पैसे कायहो काळा किंवा गोरा
घाम  गाळला  मेहनत केली
गोळा केला रात्रंदिवस खपून

नोटा कराल रद्द
अजून काहीबाही कराल
आमची ( भारतीयांची ) स्वस्त वा फुकट
मिळविण्याची सवय कशी काढलं धुवून

पावती शिवाय माल पाहिजे स्वस्त
टँक्स चे पैसे चुकवून

रांगे शिवाय प्रवेश पाहिजे
कुठलाही जादा आकार न भरून

शासना कडून साऱ्या सोइ सुविधा पाहिजे
कुठला हि टँक्स न भरून

खरं सांगायचं तर स्वस्त नाही तर फुकट
पाहिजे काही हि न करता एक पैसे हि न भरून

आता तुमचे अधिकारी शिकवतील आम्हाला
कसा काढायच्या नोटा धावून
त्या हुशार धोब्यांना देऊ आम्ही काही तरी झाकून


आम्हालाही वाटते मोदी सारे असावे वही वरती
नसावे काही झाकून
तुमचेकायदे आणि अधिकारी एवढे तरबेज
 काही केले नाही तरीही सहज जातात
आम्हाला चोर ठरवून

अश्याच देशात तुम्ही मोदी
केले किती प्रयत्न
गोर्यांचा काळा होणार
तुमचीच नजर चुकवून

सुनील 10/११/16

No comments:

Post a Comment