Tuesday, 19 April 2016

बा पांडूरंगा

Image result for pandurang photo

बा पांडूरंगा किती उभा राहशील वीटेवरी               
कर कटा वरी ठेवून||

नाही राहीला कोणी तुझा
पुंडलीका सारखा भक्त
आम्ही सारेच झालोत
धनाचेच असक्त।

बा पांडूरंगा किती उभा राहशील वीटेवरी
कर कटा वरी ठेवून ||

येउ अम्ही पंढरपूरात
भक्तीचीच उठवून अवई
पण मनांत असेल भक्ती सोडून
काही मागण्याची घाई|

बा पांडूरंगा किती उभा राहशील वीटेवरी
कर कटा वरी ठेवून ||

बघ तू उभा अठ्ठावीस युगे
अमूच्या साठी ताटकळून
पण अम्ही मात्र येणार
सुट्या आल्या तरच जोडून|

बा पांडूरंगा किती उभा राहशील वीटेवरी
कर कटा वरी ठेवून ||

बघ ना अम्ही करतो महापूजा
पावती फाडून
कारण अमूच्या कडे भक्तीचीच
बॅलन्स नाही धन सोडून|

बा पांडूरंगा किती उभा राहशील वीटेवरी
कर कटा वरी ठेवून ||

तरी सुध्धा भक्तीचाच उमाळा येतो
तुझ्या समोर उभे राहून
तेवढ्यात अमूची अवली म्हणते
उठा तुकारामा उद्या आंफीस ला

जायचे आहे लवकर पोचून|

sunil 25/09/15

No comments:

Post a Comment