Monday, 18 April 2016

मी स्वताला


Crumpled paper and businessman tearing up another paper ball for the pile - stock photo

मी स्वत:ला  कवी लेखक साहित्यिक
यातल काही सुधा मानत नाही

ऱ्हस्व दीर्घ व्याकरण छंद मास समास
यातल काही मला समजत  नाही

मी स्वत:ला  कवी लेखक,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,


 कुठून येत खालून वरून मनातून बुद्धीतून
आतून बाहेरून ते ही  मला उमजत नाही

मी स्वत:ला  कवी लेखक,,,,,,,,,,,,,,,,,,,

अव्यक्तातून व्यक्त होन  दाटून आलेल मळभ
धाड धाड कोसळून  रिक्त होन  झाल्यवर पुन्हा
भरण्या साठी वाट बघन एवढाच काय ते मला जमत

मी स्वत:ला  कवी लेखक,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

सुनील १९/०४/१६






No comments:

Post a Comment