Friday, 29 April 2016

नको गोष्ट आता रामाची













नको गोष्ट आता रामाची
नको गोष्ट  आता कृष्णाची
गोष्टआता सांग  मला
शास्त्रज्ञांची ज्ञानावंता ची
आई वेळ झाली आता माझ्या झोपेची ।

नको गोष्ट आता अर्जुनाची
नको गोष्ट  आता  एकलव्याची
गोष्ट आता सांग  मला
अब्दुल कलमांची ,अभिनव बिंद्रा ची
आई वेळ झाली आता माझ्या झोपेची ।

नको गोष्ट आता विश्वकर्म्याची
नको गोष्ट  आता  कन्वाची
गोष्ट आता सांग  मला
सर विश्वेशरयया ची  होमी भाभा  ची
आई वेळ झाली आता माझ्या झोपेची।

सुनील ३०/०४/१६  

No comments:

Post a Comment