झटले ते तुमच्या साठी
त्यांनीच का रहावे उपाशी
तुमच्या प्रेमा साठी
दाखवीली उच्च भव्य स्वपने तुमच्या साठी
ती भिव स्वपने का व्हावीत त्यांच्यासाठी
झटले ते तुमच्या साठी ,,,,,,,,,,,,,,,,
सुख समृद्धी तुमच्या साठी हे त्यांचे ध्येय होते
निवृत्ती नंतर ची मन:शांती हे त्यांचे वेड का ठरावे
झटले ते तुमच्या साठी ,,,,,,,,,,,,,,,
कुशीत घेवून जपून वाढवले हा त्यांचा त्याग होता
खुशीत तुमच्या सवे राहावे ह्या स्वप्नाचा का भंग व्हावा
झटले ते तुमच्या साठी ,,,,,,,,,,,,,,,,,,,,
तुम्ही शिकावे परदेशी जाऊन हा त्यांचा ध्यास होता
तुम्ही परतणार कधी ही वेडी आस का ठरावी
झटले ते तुमच्या साठी ,,,,,,,,,,,,,,,,,,,,
सुनील ३०/०४/१६
तुम्हला खर सांगतो
जेवढे तुम्ही चांगले दिले
तेवढेच देण्या करिता धडपडतो आम्ही मुलांसाठी
तुम्हला खर सांगतो
जरी वाटलो आम्ही आहोत मजेत येथे
तरी तिळ तीळ तुटतो अमच्या
अपुल्यात येण्या साठी
तुम्हला खर सांगतो
इथल्या सुव्यवस्थेने दिसतो आम्ही सुखवस्तू
ओढ मात्र असते तिकडचीच कितीही अव्यवस्था
असली तरीही
सुनील ३०/०४/१६
No comments:
Post a Comment