ते का पाहतात मी काय केले
मी तरी का पाहतो मी काय केले
जीवनाचा गाडा ओढतो
बॆलाच्या निष्ठेने
यात वेगळे असे मी काय केले
ते का पाहतात,,,,,,,,,,,,,,,
जीवनाची ओझी वाहत होतो
गाढवाच्या निष्ठेने
यात वेगळे असे मी काय केले
ते का पाहतात,,,,,,,,,,,,,,,
फरक एवढाच की त्यांना मन
नावाचे इंद्रिय नव्हते मला ते होते
म्ह्णूनच त्यांनी पाहीले मी वेगळे काय केले
मीही पहात असतो वेगळे मी काय केले
सुनील ३०/०४/१६
No comments:
Post a Comment