बायको चालली माहेरी
अनंद मावेना उदरी
नाही उशिराची हजेरी
नाही घरची शिदोरी
बायको चालली माहेरी ,,,,,,,,,,,,
कांदा बटाट्याची
ची न राहणार शिरजोरी
आता मस्त पिझ्झा येईल दारी
बायको चालली माहेरी ,,,,,,,,,,,,,,,,,,,
मित्रा संगे होईल फेरी
चालेल आमची मुजोरी
बायको चालली माहेरी ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
चालेल रात्रीची मुसाफिरी
होईल अड्यावर वारी
बायको चालली माहेरी ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
थोड्या दिवसातच विरेल या दिवसांची शिरशिरी
बायकोच्या परतण्याची भरेल हुरहुरी
No comments:
Post a Comment