रिते जाहले सारे घन
धडधडा कोसळून
नाही उरला टिपूस
रिक्त झालो हो आतून
पुन्हा आता वेचण्यास
बिंदू एक एक निवडून
चहु कडेच हिंडतो
लावूनिया पीस
पाहुनिया उनउन
आता वाटे सोडून द्याव
हे रीत होन पुन्हा पुन्हा
संचय ठेवावा आपुला आपण
जसा ठेवता तुम्ही जन
खालून ऐकता आर्त जलासाठी
अंतरी गलबलून येईल
शेवटी रिते होण्या साठीच जन्म आपुला
याचा साक्षत्कार होईल
सुनील १५/०५/१६
No comments:
Post a Comment