जोडतात मित्र कधी
आपसूकच अपुले
नाही कधी जात पात
लिंग धर्म येती आड
मन जुळतात तेव्हांच
मैत्र जुळते आपसूकच अपुले
करतोते हितगुज सुख दुखाचे
मनी ठेवूनी विश्वास
खोलतो मनाची कवडे खास
तेथेच मैत्र फुलते आपसूकच अपुले
केले जरी वितंड वाद
तरी तो मानीती धाकुले
सुखातच जरी नाही परी
दुखात दिसतो तो आधार आपुले
तेथेच मैत्र विसावते आपसूकच अपुले
सुनील १५/०५/१६
No comments:
Post a Comment