सावधान सावधान
वाचवा हो वाचवा
टाहो फोडी सारे जन
तरीही काही जन
मानती ना हे गाराण
सावधान सावधान
आहे रे नी वाचवावे
नाही रे ला तेच द्यावे
ठेवावे हे भान
तेव्हाची पुरेल
निसर्गाचे हे वाण
सावधान सावधान
ढाळतो निसर्गाचा तोल
आम्ही माणसे एवढी थोर
वारे माप उधळतो आम्ही
निसर्गाचे मोल नाही घातली भर
केली त्याची रण रण
सावधान सावधान
देत होता वारेमाप तेव्हा
नाही राखली जाण
आता त्याने आक्रसले
तेव्हा होते वण वण
सावधान सावधान
सुनील २२/५/१६
No comments:
Post a Comment