काय झालय माणसाच्या माणूसकीला
माणसाची लेकुरे भटक्या कुत्र्या सारखी
रस्त्यावर वण वं ण भटकतायत
कुत्र्या ची लेकुरे मात्र माणस
माणसा सारखी जपतायत
काय झालय माणसाच्या माणूसकीला
माणसाची लेकुरे अर्ध्या भाकरी साठी
हात पसरून फिरतायत
कुत्र्याची पिल्ले मात्र पेडीग्री खाऊन
आरामात सुस्तावतायत
काय झालय माणसाच्या माणूसकीला
माणसाचा डॉक्टर माणसाला
जनावरां सारखा तपासतो
जनावरां चा डॉक्टर मात्र जनावराला
माणसा सारखी ट्रीटमेंट देतो
काय झालय माणसाच्या माणूसकीला
कलियुगाचा महिमा असेल हा
माणसातल्या माणुसकी पेक्ष:
जनावराच्या कृतज्ञेवर जास्त
माणसाचा विश्वस दिसतो
काय झालय माणसाच्या माणूसकीला
No comments:
Post a Comment