Tuesday, 17 May 2016

माणसा परास

Image result for dog


श्वानाच्या कडून आलेले उत्तर


माणसा परास आम्ही
आम्ही कुत्रे बरी


धन्याने मारल ह्क्कल
तरी आम्ही नाही करत शिरजोरी
माणसाचे काय ते तुम्हीच ठरवा

माणसा परास आम्ही
आम्ही कुत्रे बरी

द्याल तिथे द्याल तसे
राहतो आम्ही बापुडे बरी
माणसाचे काय ते तुम्हीच ठरवा

माणसा परास आम्ही
आम्ही कुत्रे बरी

काही झाल तरी आम्ही इमान नाही विकत
  इमानदारी करतो खाऊ त्याची भाकरी
माणसाचे काय ते तुम्हीच ठरवा

माणसा परास आम्ही
आम्ही कुत्रे बरी






No comments:

Post a Comment