नशीब नशीब म्हणजे काय असत
दही पाणी आणी रवी याचं
याचं छानस घुसळन असत
जमल तर लोणी
फसल तर फेस अन पाणी असत
नशीब नशीब म्हणजे काय असत
लाकूड योग्य दाब आणी तापमान
याच छानस मिश्रण असत
जमला तर हिरा
फसल तर नुसता कोळसा अन राख असत
नशीब नशीब म्हणजे काय असत
घडणारा घडवणारा आणी प्रारब्ध
याच छानस दर्शन असत
जमल तर आदर्श
फसल तर आयुष्या चे धीन्द्वाडे अन गरीबीची लक्तर असत
नशीब नशीब म्हणजे काय असत
सुनील ३/६/१६
No comments:
Post a Comment