Monday, 2 May 2016

हे तंत्र तिला शिकवते कोण केव्हां ?

Image result for indian mother sketch

आईस का कोणी 
सांगावे लागते का केव्हां
तुमच्या मनातला विचार 
बोलवा लागतो का केव्हां 
हे तंत्र तिला शिकवते कोण केव्हां ? 

तुम्ही धडपडलात  जगात कोठे 
हे आईस न सांगता ठावे
तुमच्या मनीचा तोल 
न बोलता सावरते ती तेव्हां 
हे तंत्र तिला शिकवते कोण केव्हां ?

जगात वेड्या मोहापायी
 चुकते पाऊल तुमचे जेव्हां 
झाकून तुमचे अपयश 
ती ठाम उभी असते हुरूप द्यावया तेव्हां 
हे तंत्र तिला शिकवते कोण केव्हां ?

स्वतःचे दुख लपवूनी 
ती ह्सतेच जेव्हां 
आम्ही सारे खुळे न उमजतोच तेव्हां ?

सुनील २/५/१६ 

No comments:

Post a Comment