
अखिल भारतीय ग्राहक चळवळी चे प्रणेते मा . बिंदुमाधव जोशी यांना जाऊन आज एक वर्ष झले
अतिशय प्रतीभावान व तेजस्वी वकृत्व असलेले मा .बिंदुमाधव ( नाना ) यांच्या जाण्याने ग्राहक चळवळी चे खूप मोठे
नुकसान झाले हे निश्चित .
म नाना नी ज्या वेळेला हा विचार केला तेंव्हा ग्राहक हित हा विषयच सर्व जनते साठी उस्तुक्तेचा व व्यापारी लोकासाठी
चेष्टेचा विषय होता
मूलतः पाश्चिमात्य विचारा ची असलेली हि चळवळ आपल्या देशात रुजताना पूर्णतः भारतीय म्हणजेच हिंदू विचारावर
उभी राहावी अशी रचना करण्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले
या विचारांचा पाया भक्कम व्हवा व या चळवळी साठी कार्यकर्त्यांची फळी उभी राहावी हा त्यांचा ध्यास होता व त्याच
साठी त्यांनी आसेतू हिमाचल प्रवास केला ,कार्यकर्त्यांच मोहोळ उभे केले दिल्ली ते गल्ली पर्यत ग्राहक हिताचा विचार
पोहचवला . त्यांनी या कार्या साठी त्यांनी हजरो प्रबोधन वर्ग घेतले
याच साठी त्यांनी १९ ७४ साली अखिल भरतीय ग्राहक पंचायती ची स्थापना केली .
याच बरोबर ग्राहकांना कायद्यचे सौरशन मिळावे ह्या साठी त्यांनी सरकार दरबारी खूप प्रयत्न केले त्यासाठी त्यांनी
तात्कालीक पंतप्रधान ,राष्ट्रपती यांना भेटून या कायद्याचे प्रारूप सरकार दरबारी उभे केले व प्रयत्न पूर्वक हा कायदा
सरकार कडून सम्मत करून घेतला .
एकाच वेळेला सरकार कडून कायद्याचे सौरशन व दुसऱ्या बाजूने ग्राहकांचे प्रबोधन या दोन्ही स्तरावर ग्राहकहीत
साधण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिले वयाच्या ८४ वर्षा पर्यंत त्यांनी घेतलेला हा वसा सोडला नाही .
मला या तपस्वी व्यक्ती बरोबर १२ वर्ष या कार्या च्या निमित्तने अतिशय जवळून सपर्क आला
ग्राहक चळवळी चे प्रणेते ग्राहकतिर्थ मा.बिंदुमाधव जोशी यांना भावपूर्ण श्रधांजली
No comments:
Post a Comment