Saturday, 14 January 2017

उगाच मिरवताय टेंभा

उगाच मिरवताय टेंभा 
 पुण्यात पुणेकर आहे तरी कुठे 
  सोलापूरकर ,लातूरकर नांदेडकर 
 मद्रासकर ,कोचिनकर अगदी पटना 
 बिहारकर नेपाळकर सुद्धा
  यांनीच भरलंय पुणे 
  उगाच मिरवताय टेंभा .........
  सदाशिव पेठेत असतील दोनचार घरे 
 तेथेही असतील म्हतारे कोतारे 
 बाकीच्यांनी केव्हाच ठोठवलीयत 
 अमेरिकेची दारे 
  उगाच मिरवताय टेंभा ..........

 बदलीय सारी संस्कृतीचं पुण्याची 
 तुळशी बगे पेशा कॅम्पा तली  गर्दी मोलाची
 बालगन्धर्व  पेक्षा आयनॉक्स चीच 
 चर्चा ज्याची त्याची
  उगाच मिरवताय टेंभा ............
 शांत स्वच्छ सुंदर पुणे 
 केव्हाच हरवलंय ट्रॅफिकच्या गदारोळात 
 ओव्हरब्रीजच्या जनजाळात ,
 आता इथे मराठमोळा बाज दिसतो कवचितच 
 दिसतो मात्र आंग्लाळलेला गदारोळ खचितच 
  उगाच मिरवताय टेंभा.................
  हल्ली इथे पैठणीचे दुकानदार कमी 
 पटलुणीचे दुकानदार भेटतात बक्कळ 
 खणाचे कापड हुडकावे लागेल 
 टॉप मात्र दिसतील लटकवलेले दुकानभर 
 उगाच मिरवताय टेंभा ...............
  मराठी सणाच विचारलं तर ते 
 दिसतात फ्लेक्सवर 
 बाकी हट्ट पूजे पासून दुर्गा पूजे पर्यंत 
 फ्रेंडशिप डे पासून ख्रिसमस पर्यंत 
 गाजतात पुणे भर 
 उगाच मिरवताय टेंभा ............
Sunil

No comments:

Post a Comment