Monday, 16 January 2017

आंनद वृत्तीत असावा लागतो

आंनद वृत्तीत असावा लागतो 
 कशातही मानण्यासाठी 

 तो मिळतो महालात ,
  बंगल्यात,चाळीत  
 अगदी रस्त्याकडेच्या 
 खोपटात सुद्धा 

  आंनद वृत्तीत असावा ........

 तो मिळतो करोडोत 
 लाखात ,हजारात 
 अगदी आज्जीने दिलेल्या 
 नया पैश्यात सुद्धा 

 आंनद वृत्तीत असावा ..........

 तो मिळतो फाईव्ह स्टार मध्ये 
 इराण्या कडे ,खानावळीत 
 भूकलागल्यावर  मिळणाऱ्या 
 कोरभर शिळ्या भाकरीत सुद्धा 

 आंनद वृत्तीत असावा ............

 तो मिळतो आकाशात 
 दारात ,घरात  कुठेही 
  कधी तर   मस्त मातीत  
 लोळून सुद्धा 

 आंनद वृत्तीत असावा .........

 त्याला नसते वेळ काळ स्थळ 
 हवी असते फक्त वृत्ती 
 ती असली कि मिळतो 
 आंनद आंनद आणि आंनद  


 सुनील १६/१/ १७

No comments:

Post a Comment