Friday, 15 July 2016

हे मन खरच वेड असत



हे मन खरच वेड असत !

हे स्मशानात बसून करत जीवनाच्या कविता
जगताना मारत गप्पा मरणाच्या किंवा त्याही  पलीकडच्या

हे मन खरच वेड असत ! 


हे जमीनी वर असताना याला आवडतात
चन्द्र सूर्य ग्रह ताऱ्याच नभांगण
गेला अवकाशात गेला चंद्रावर तर म्हणत
 जमीनी कडे बघून सारे जहाँसे अछा
आपल्याच धरतीला

हे मन खरच वेड असत ! 

असला वेग म्हणून किती किती पळायचं
ऑफिसात असताना घरी काय चालय  याचा विचार
घरी असताना ऑफिस मध्ये काय चालय याचा फोकस ठेवायचा

हे मन खरच वेड असत !

त्याला ठेवा बर ताब्यात नाहीतर  ते भलतंच सुटायचं
आणी  शेवटी येरवड्यात स्थिरावयाचं

हे मन खरच वेड असत  !

No comments:

Post a Comment