Thursday, 14 July 2016

समतेची ही वारी



समतेची ही वारी  इथे नांदते समता न्यारी 
राव रंक सारे समान पांडुरंगा दारी 

इथे ज्ञाना तुका नामदेव सारे एका माळेत 
पांडुरंग लेकुरवाळा उभा ठाकुणी पाहतो  लेकूरची आस 
त्यांच्या वीण त्याचा जीव कासावीस 

इथे ना  जात ना  पंथ वारकरी हाची संत 
इथे नाही कुणाचीच मुजोरी कुणाचीच शिरजोरी 
इथे फक्त भक्तीच साजीरी 

इथे ना भोग ना भाग इथे नाही कसलाच लाभ 
दिसता वारकरी जय जय रामकृष्ण हरी 
अंतरीचा पाडुरंग उजवतात 

जैसे मुली जाय माहेरा तैसे वारकरी जाय पंढरपुरा 
तिचे पहाता माउली डोळे वाही झर झरा 
तैसेच वारकरी अनुभवतो  पंढरपुरा  

सुनील 

No comments:

Post a Comment