Friday, 1 July 2016

स्वप्नांना वास्तवाचे भानच का नसावे ?


dream के लिए चित्र परिणाम


स्वप्नांना वास्तवाचे भानच का नसावे  ?
वास्तवाचे सत्याशी नाते गहिरे 
स्वप्नांना वास्तवाचे वावडे 

स्वप्न सत्यात येतात 
वास्तवाचे भान ज्यांना 
स्वप्न दु:स्वप्न होतात 
जे स्वप्न वास्तवाला न भिडे 

वेड्यात वीर दौडले चार 
ऐसे स्वप्नाचे धावणे 
वास्तवाची ढाल घेऊन 
कधी हार माघार घेऊन लढले
तरच ते जगती जिंकती 
स्वप्नवत विजया चे चौघडे  

स्वप्नाला अवास्तवाच्या दारी न नेता 
स्वप्नाला लावता पंख वास्तवाचे 
ते स्वप्न सत्यात येतें 
जिंकण्यास त्याला जग ही तोकडे 

No comments:

Post a Comment