Thursday, 11 August 2016

प्रार्थना करतो त्या तत्वाची




प्रार्थना  करतो त्या तत्वाची 
जे चहू कडे व्यापले 

अर्पितो जल जलास 
श्वास श्वासास 
निसर्ग निसर्गास 
जे त्यांनीच निर्मिले 

प्रार्थना  करतो,,,,,,,,,,,,,,,,,,,

प्रार्थना हीच साधना 
प्रार्थना हीच आराधना
प्रार्थना हीच तपसाध्य आर्चना 


प्रार्थना  करतो,,,,,,,,,,,,,,,,,,,,

प्रार्थनेचा अर्थ सार्थ ठरतो 
जेंव्हा सत्व अर्पितो निराकारास 
गाळूनी पडता पुटे अंतरी आत्मतत्व झळाळते 

No comments:

Post a Comment