मी नास्तिक का मी आस्तिक
याचा मलाच पत्ता नाही
कुणी केली हि व्यख्या
आस्तिकांची नास्तिकाची
माणसानेच बनविली कुरणे
आपापले कुंरण चरण्यासाठी
आस्तिकांनी नास्तिकाला झोडपले
नास्तिकांनी आस्तिकांचे जगणे नाकारले
यांनी देवालाच नाकारले
कारण देव दिसत नाही
सिद्ध करता येत नाही
त्यांनी विज्ञानाला नाकारले
कारण ते सतत बदलते
आजचे सिद्धांत उद्या चुकीचे ठरतात
अरे वेड्यानो अंतिम सत्याच्या वाटा आहेत दोन्ही
याची काय आणी त्याची काय
शेवटी पोहचलाच तर तिथेच पोहचाल
जिथे सत्य असत्य ,जीव शिव
सारेच विरघळतात एकतत्वात
No comments:
Post a Comment