पाउल असे न दिसे
जिथे व्हावे नतमस्तक
असे मी न बोलतो गर्वाने
पाउलाशी वाकताच स्वार्थाची प्रतीमा भासे
झोकुनी दिले ज्यांच्या साठी
समीप जाऊन पाहताच त्या पाऊला वरी
स्वार्थाचेच आछादन भासे
चहूबाजूला मांडला स्वार्थाचा बाजार
मिळतील कसे त्या दलदलीत
निस्वार्थी पाऊलांचे ठसे
तालेवार मी धुंडाळतो असे पाऊलांचे ठसे
परी मी न्याहाळिता स्वपाउल
तेही आता स्वार्थाने बरबटलेले भासे
मिळेल कधी तरी असे पाउल
असे मनोमन खात्री भासे
शोधेन मी जेंव्हा सोडून स्वार्थाच्या
वाहना दूर कोठे तरी मागासे
No comments:
Post a Comment