Monday, 10 October 2016

ते फुल हासरें सुंदर शांत होते






ते फुल हासरें सुंदर शांत होते 
हल्ली ते रागीट तापट जाहले 

पूर्वी असे फुलाला वेड प्रेमळ लड़ीवाळ पनाचे 
हल्ली फुलास ते सारे पांचट फालतू वाटते 

ते फुल हासरें सुंदर शांत होते 
हल्ली ते रागीट तापट जाहले  

पूर्वी वयाच्या  दाखल्याचा त्या फुलास  कधी अडथळा न आला 
हल्लीते फुल  जागो जागी वयाचा दाखलाच फडकविते 

ते फुल हासरें सुंदर शांत होते 
हल्ली ते रागीट तापट जाहले  

परीसर हिरवा  आजूबाजूचा पार काळा करडा झाला 
शरदात फुलाने तरी फुलावे कसे वसंत केव्हांच दूर गेला 





No comments:

Post a Comment