उधळलं उखडलं धड्पडल
मायच असते त्याला
आपल्या कवेत घेणारी
कोखरू सगळ्यात ढुसने देत उधळत
इतरांच्या लता खाऊन
शेवटी मायेच्या कासंडी ला भिडत
कोखराला वाटत घुसावं इतरांच्या कळपात
आई ला मात्र हवं
ते तिच्या दृष्टी क्षेपात
मायेत नसतो जेव्हां त्राण
हवी असते कोखराची सावली
तो गुंततो तेव्हांच इतरांत
सावली विना उध्वस्त होते माउली
No comments:
Post a Comment