मि काय लुटू सोने
असता सर्वस्व माझे तिथे
ते उधळती स्वताच्या
जिवाचे सोने सीमेवरती
मि कशाला वाटू
आपटया चे पानूटे
मि काय लुटू सोने
असता सर्वस्व माझे तिथे
वेळ पडल्या करतील सिमोल्लंघन
करतील ते उध्वस्त शत्रु चे घरटे
मि कशाला जाळुनी रावण
उडवू काजळी चे पुटे
मि काय लुटू सोने
असता सर्वस्व माझे तिथे
तिथे नसेल गोड़ धोड़
कर्तव्या पुढती नसेल भूके ची जाण
मि आताच कशाला
भरु घरात पकव्वाना ची संपूटे
मि काय लुटू सोने
असता सर्वस्व माझे तिथे
येतील जेंव्हा घरी
होईल दसरा दिवाळी साजरी
मि आताच कशाला सजवू स्वताला
ते असतील सीमेवरती एकटे
No comments:
Post a Comment