Friday, 14 October 2016

आज कोजागरी Sharad Poornima

आज कोजागरी 



Image result for kojagiriImage result for kojagiri





भारतीय सण ऋतुमानात होणाऱ्या बदलांच्या अनुषंगाने साजरे केले जातात. पिठुर चांदणं अंगावर घेत रात्र जागवण्याचा उत्सव म्ह्णजे कोजागरी. प्रसन्न शरद ऋतूच्या आगमनात साजरा होणारा दिवस म्हणून कोजागरीची ओळख आहे. हा दिवस आश्वि्न प्रतिपदेला साजरा केला जातो. म्हणून तिला आश्विनन पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी आकाशात ढगाआड लपलेला चंद्र आपले दर्शन देतो. हवेत हळूहळू गारवा वाढू लागतो आणि चंद्राच्या शीतल, शांत किरणांची अनुभूती देणारी कोजागरी पौर्णिमा मसालेदार दुधाचा आस्वाद घेत उत्साहात साजरी केली जाते.  मसालेदार दुधाच्या मेजवानीचा दिवस म्हणून कोजागरी पौर्णिमेची सर्वसामान्यांत ओळख आहे. अलीकडे गरम मसालेदार दुधाचे घुटके घेत काव्य, गायन, वादन, नर्तन, अंताक्षरी, प्रश्नतमंजूषा, नाट्यछटा, गप्पागोष्टी, विनोदी किस्से व चुटके, प्रश्न मंजूषा, जेवण व गप्पागोष्टींच्या मैफलींची साथ देऊन ती अधिक आनंददायी बनवली जाते. या निमित्ताने रात्री एकत्र येऊन चांदण्या रात्रीची मजा अनुभवली जाते. कोजागरी पौर्णिमेशी संबंधित काही दंतकथा आहेत. या संदर्भातील मगध देशातील कहाणी विशेष ऐकण्यास मिळते. कोजागरीच्या दिवशी लक्ष्मीपूजेला खूप महत्त्व आहे. यादिवशी तिची पूजा करतात. तिचे स्वागत करण्यासाठीच मध्यरात्री बारापर्यंत सर्वजण जागे राहतात. या दिवशी मंदिरे, उद्याने,या ठिकाणी आपल्याला गर्दी पहायला मिळते,काही शहरात उद्याने बारा वाजे पर्यंत उघडी ठेवली जातात. दिव्यांचा लखलखाट केला जातो. काही जण दिवसभर उपवास करतात आणि सायंकाळी देवीची पूजा करतात. नंतर तिला पोहे आणि शहाळ्याचा नैवेद्य दाखवतात. इतरांना देऊन मग तो प्रसाद म्हणून ग्रहण करतात. या दिवशी लक्ष्मीप्रमाणे चंद्राचीही पूजा केली जाते. या दिवशी महिला चंद्राला ओवाळतात. त्याची मनोभावे पूजा करतात. केशर, सुकामेवा, दुधाचा मसाला घालून घरोघरी दूध आटवले जाते. रात्री बाराला चांदण्या रात्री त्या दुधाचे घुटके घेतले जातात. यामागे शास्त्रीय कारण सांगितले जाते. आश्वि न पौर्णिमेला चंद्राची किरणे अतिशय शांत असतात. ती अंगावर पडणे हे आरोग्याच्या दृष्टीने चांगले असते. आयुर्वेदातही त्याचे महत्त्व सांगितले आहे म्हणूनच या दिवशी चंद्राच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी गायीची पूजा केली जाते. या दिवशी महिला शुभ्र वस्त्रे परिधान करून चांदीचे दागिने घालतात.
कोजागरीनिमित्त नातेवाईक, मित्र एकमेकांना भेटतात. एकत्रित जेवणाचा बेत आखून सामूहिक भोजनाचा आस्वाद घेतात. लहान मुलांसाठी तर ही एक पर्वणीच आहे. मुलांसाठी काही जण बाहेर जाण्याची योजना आखतात. त्यांच्यासाठी बागेत जाऊन भोजनाची मजा लुटतात. अलीकडे मोठमोठ्या इमारतींमधील लोक कोजागरी पौर्णिमा उत्साहाने साजरी करतात. चटपटीत पदार्थ, जागरण, संगीत रजनी, मैफली रंगवतात. काही जण सहकुटुंब चित्रपट, नाटकांचा बेत आखतात. कोजागरीच्या चांदण्या रात्री विविध कार्यक्रमांच्या आखणीतून ती अधिक आनंददायी व उत्साही बनवतात.


दुधाचा मसाला
साहित्य  :- ५० ग्रॅम काजू,२५ ग्रॅम पिस्ते, २५ ग्रॅम बदाम, १० ग्रॅम वेलची, २० ग्रॅम केशर, १ जायफळ
कृती : सर्व साहित्य एकत्र करून  मिक्सर मधून बारीक वाटून घ्यावे. आणि बाटलीत भरून ठेवावे.

मसाला दुध
साहीत्य:- दूध एक लिटर (म्हशीचे),  साखर अर्धी वाटी (आवडीनुसार कमी-जास्त करावी),
दुधाचा मसाला*
साहित्य  :- ५० ग्रॅम काजू,२५ ग्रॅम पिस्ते, २५ ग्रॅम बदाम, १० ग्रॅम वेलची, २० ग्रॅम केशर, १ जायफळ
वेलचीपूड १ टीस्पून, जायफळ १/२ टीस्पून, बदाम, काजू, पिस्ताची पावडर दोन टेस्पून (सजावटीसाठी थोडे पातळ काप ठेवावेत), चारोळी १ टीस्पून, केशर
कृती:- प्रथम एका जाड बुडाच्या पातेल्यामधे दुध तापण्यासाठी गॅसवर ठेवावे. तापून फुगा आला की,गॅस बारीक करावा व त्याच्यामधे डाव टाकावा अथवा एक काचेची चहाची बशी पालथी टाकावी म्हणजे दुध तळाला लागत नाही.आणि पाच मिनीटे उकळू द्यावे. उकळून थोडे आटले की त्यामधे दुधाचा मसाला (वेलची,जायफळाची पूड,सुक्या मेव्याचे कुट व आणि केशर) साखर घालावी. एक उकळी आणावी व गॅस बंद करावा. सजावटीसाठी शिल्लक ठेवलेले सुकामेव्याचे काप व चारोळ्या वरून घालावेत व आवडीप्रमाणे, फ्रिजमधे थंड करून किंवा गरम पिण्यास द्यावे.शक्यतो कोमटसर दुधच प्यावे.चवीला छान पण लागते व थंड दुधाने पोटात गॅस होतात,ते होण्याची भिती पण रहात नाही.
टीप :- सुक्यामेव्याची  बारीक पावडर न करता थोडे भरड कूटच ठेवावे दुध पिताना मधे-मधे दाताखाली आलेले छान लागतात.                         

No comments:

Post a Comment