Thursday 1 December 2016

तो आणि त्याचे गणित

तो आणि त्याचे गणित

विश्वाचे गाडे चालवताना 
त्याला हि पाप पुण्य  चांगले वाईट 
अशी बरीच त्रैराशिके सोडवावीच लागतात 
बाकी शून्य करण्या साठी  
भूकंप ,पूर ,सुनामी असले हाच्चे घायवेचं लागतात 

तोही दमतो थकतो 
गणितात चुका करतो 
कधी तरी चुकून डोळा सुद्धा लागत असेल 
म्हणूनच तर कधी कधी चांगल्याला दुःखाचे भोग 
आणि वाईटाला सुखाचे भोग पदरी पडतात 

त्यालाही हल्ली गरगरायला लागत
आकड्यांच्या हालचाली बघून 
चांगल्याचे वाईटात व वाईटचे चंगल्यात 
रूपांतरा ची गती पाहून 
तो तरी काय करणार तोही वाढवतो   हाच्याचे 
प्रकार त्रीव्रता  सुद्धा 

नाही सुधारली कृती आपली माणसाने 
वारंवार त्याच्या गणिताची फजिती करून 
घेईल तो एक एक मोठा हचा प्रलय नावाचा 
सारेच गणित करून शून्य 
जाईल क्षीरसागरात अराम करायला 

सुनील ३०/११/16

No comments:

Post a Comment