Thursday, 1 December 2016

एक प्रयत्न गझल सारखे काही

एक प्रयत्न गझल सारखे काही करण्याचा 
जमतेय का नक्की सांगा 



नियतीचा फेरा येतो जेव्हा 
सारेच पालटुनी जातो 

मी कैफात जगत होतो 
मंद्र तार सप्तकात बेफाम 
स्वर बरसत होतो 

नियतीचा एक पलटा
ऐसाच मजवरी आला 
साऱ्याच सूर सप्तकांना खर्जात घेऊनि गेला 

नियतीचा फेरा येतो जेव्हा 
सारेच पालटुनी जातो

लावताच तारा वाटले 
सुंदर जुळल्या आता 
साऱ्याच सुरांना धरुनी झंकारत होत्या 

नियतीने फिरविता कळ 
साऱ्याच बेसुऱ्या जहाल्या

नियतीचा फेरा येतो जेव्हा
सारेच पालटुनी जातो 

मल्हार लागला  होता 
सुंदर फेर धरुनी 
घन घन बरसत होता 

मध्येच नियतीच्या सूर पलट्याने 
भैरवी भरून गेला 

सुनील २/१२/१६

No comments:

Post a Comment