Saturday, 30 April 2016

शब्दा आज स्तब्द कसे

Image result for words marathi  photos


शब्दा आज स्तब्द कसे काहीच का कळेना
शृंगारातील श पासून शोकातील श चा अर्थ उमगेना ।

वाटते मला पतंगा परी ज्योतीवर झेपवावे
परी बंध आड यती तोडावे कसे कळेना ।

प्रेमासही वासनेचा गंध येतो
प्रेम खरे की वासना मज उमगेना ।

भाव भाववनाचा कल्लोळ होतो
मज काहीच का उमगेना ।

अर्था वीना व्यर्थ सारे
अर्थ सर्वार्थाने कळेना ।

सुनील १०/१२/९१

No comments:

Post a Comment