मी स्वप्नात रमतो
ती सत्यात वावरते
खिशात नसता छदाम
मी ताजमहाला ची स्वप्ने रंगवतो
ती मात्र आलेल्या पैशातून
घराचा हप्ता साठवते
मी स्वप्नात रमतो ,,,,,,,,,,,,,,,,,,
मी करीना ची साडी बघून
ती घेण्याचा विचार मांडतो
ती मात्र रस्त्यावरून छानसा
टी शर्ट घेऊन येते
मी स्वप्नात रमतो ,,,,,,,,,,,,,,,
मी मित्रांना फाईव्ह स्टार
चा बेत सांगतो
ती मात्र घरातच खमंग
थालपिठाचा बेत करून
मित्रांची वाहवा घेऊन जाते
मी स्वप्नात रमतो,,,,,,,,,,,,,,,,,
असे का होते मी तिच्या स्वप्नांना
सत्य न समजतो
पण ती मात्र माझ्या स्वप्नांना
सत्यात उतरविते
No comments:
Post a Comment