मी जगलो मध्यम वर्गाच्या चौकटीत जमेल तसा
थंडीत फटक्या पांघरुणात शरीर कोंबाव तसा
जमेल तस जमल तर हाच आमच मूख्य मंत्र
नाही जमल नियोजन फसल तर
कसनुस हसायचं हेच असेल अमुचे शस्त्र
मी जगलो ,,,,,,,,,,,,,,,,,,,
महीन्याच्या सुरवातीला येणाऱ्या रसदी
चालायचं सार संसारच यंत्र
चुकून काही आपसूकच अल गंडातर
तर चुकायच सारच तंत्र
मी जगलो,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
मन मारून रहायच दुसऱ्या साठी जगायचं
राहील तर खायचं नाही तर उपाशी झोपायचं
मरण्या साठी जगायचं का जगण्यासाठी मरायचं
हेच अवघड शास्त्र
मी जगलो ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
तुझ्या साठी सर्व काही असे म्हणत रहायचं
काही नाही करतायेत या साठी कुढायच
माझ्या साठी काही नाही सारे तुझ्याच साठी
हीच असते खरी सर्वांची भ्रांत
मी जगलो ,,,,,,,,,,,,,,,,,,
एक मात्र खर असत इतरां साठी जगन हेच
त्यातल खर असत सूत्र
एकमेकाच्या आंनदात
जागवतील रात्र
सुनील ६/६/१६
No comments:
Post a Comment