Saturday, 7 May 2016

हाच धर्म मानेन का मी ?





तहानलेल्या पाणी
भुकेलेल्या भाकरी
निराधाराला आधार

हाच धर्म मानेन का मी ?

अशक्ता ला सशक्तता
दुर्बलाला सबलता
पोरक्याला पालकत्व

हाच धर्म मानेन का मी ?

अत्याचराला आव्हान
गरजूंना मदत
समाज उपयोगी दातृत्व

हाच धर्म मानेन का मी ?

सुनील ८/५/१६


No comments:

Post a Comment