Wednesday, 11 May 2016

केल्या चुका कितीमी


Image result for life of balancing


केल्या चुका कितीमी
अजूनी करतो आहे
सावरल्या किती तू
अजुनी सावरतेस  आहे


तू दाखवते  वाट सुखाची
तरीही मी फुफाट्या ने च चलतो
तरीही  त्या वाटेवरचे काटे  तू वेचतेस

केल्या चुका कितीमी ,,,,,,,,,,,,,,,,,,,,

सरळ चालावे हा तुझा हट्ट
मि हटकून वेडी वाकडी वळणे घेतो
तरीही ह्या वळणावर  तोल जाता
तोही तू सावरतेस

केल्या चुका कितीमी ,,,,,,,,,,,,,,,,

तू  सर्वस्व अर्पिले तरीही
मी माझ्यातच मग्न
  कोरडाच राहतो

सुनील १२/५/१६



No comments:

Post a Comment