शब्दास जरी रंग रूप रंग गंध नाही
तरी भावनेची ओल आहे.
चितारीता शब्द भावनांच्या कुंचल्याने
त्यांना शब्दास रूप रंग गंध
सारेच प्राप्त होते
शब्द विचारात येतां असती बापूडे बिचारे
भावनांच्या मखरात बसतां होती श्रीमंत सारे
शब्द प्रकटतात तेंव्हा असतात गंधहीन गरे
डुंबता भावनांच्या गंधात उधळती सुगंधी फवारे
शब्द उतरतात तेंव्हा असतात निर्जीवच उतारे
भावनांचे रंग गंध प्राप्त होता प्रकटती अलौकिक रूपात न्यारे
सुनील
No comments:
Post a Comment